PHOTO : वीज वितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचा शेतातील ऊस जळून खाक
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांगसौदाणे गावातील दोन शेतकऱ्यांचा ऊस शॉट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. (Nashik Sugarcane fire)
-
-
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांगसौदाणे गावातील दोन शेतकऱ्यांचा ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे.
-
-
डांगसौदाणे येथील दिगंबर धर्मा बोरसे यांच्या शेतातील 7 एकर तर वंदना काकुळते यांचा 2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे.
-
-
बोरसे यांच्या शेतात वीजवितरणाच्या तारांचे मोठे जाळे होते. या तारा शेतात लोंबकळल्याने बोरसे यांनी वीजवितरणच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
-
-
मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे साधारण 20 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
-
-
या शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रात आडसाली ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांनंतर हा ऊस गाळीपासाठी नेण्यात येणार होता.
-
-
मात्र शॉर्ट सर्किटमुळे हा ऊस आगीत संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. तसेच ऊसामध्ये केलेले ठिबक सिंचनही पूर्णपणे जळाले आहे.
-
-
दरम्यान वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी अद्याप याचा पंचनामा केलेला नाही.
-
-
त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.