अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान तिच्या फोटोंमुळे कायमच चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी सुहाना आपले नवनवीन फोटो सतत शेअर करत असते.
तिच्या या फोटोंकडे पाहता, ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.
नुकतेच तिने आपले नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्टमध्ये सुहानाने नवे फोटोशूट केले आहे.
काही दिवसांपूर्वी रंगावरून कमेंट करणाऱ्यांना सुहानाने चांगलेच उत्तर दिले होते.
सुहाना खान तिच्या या बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत असते.
तिचा फॅशन सेन्स आणि तिचे फोटोशूट पाहता, भविष्यात शाहरुखची लेक चित्रपटांमध्ये दिसली तर नवल वाटणार नाही!