बॉलिवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. त्याने २४ वर्षांपूर्वी हिंदू धर्मीय गौरीशी लग्न केले आहे. त्यांना तीन मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम. आता घरात्या धर्माला मानतात असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया..
सुहान खान लहान असताना तिने एकदा वडिलांना आपला धर्म कोणता असा प्रश्न विचारला होता. याबाबत शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
'आम्ही हिंदू-मुसलमान यावर बोललो नाही. मी मुस्लिम आहे आणि माझी पत्नी हिंदू आहे. आणि माझी तीनही मुले हिंदुस्तानी आहेत' असे शाहरुख एका मुलाखतीमध्ये म्हणाला. तेव्हाच त्याने सुहानाचा किस्सा सांगितला.
शाहरुख म्हणाला, 'जेव्हा मुले शाळेत जातात तेव्हा त्यांना फॉर्म भरताना धर्म लिहिवा लागतो. माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिने मला येऊन विचारलं पप्पा आपला धर्म कोणता?'
पुढे सुहानाला दिलेल्या उत्तराविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, 'मी सुहानाच्या फॉर्ममध्ये लिहिले की आम्ही भारतीय आहोत. आमचा कोणताच धर्म नाही आणि नसलाही पाहिजे.'