आता प्राजक्ता भटकंती करण्यासाठी निघाली आहे. ‘आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत...म्हंटल आपणही जे सहज शक्य आहे ते करूया ...Off to THE vacation...#हिमाचलप्रदेश’ असं कॅप्शन देत तिनं आपण हिमाचलप्रदेशला फिरायला निघालो असल्याचं प्राजक्तानं सांगितलं.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
आता तिनं या ट्रीपचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
‘सेल्फ लव्ह’ असं कॅप्शन देत आता तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.