कोरोना संक्रमण लक्षात घेता यावर्षीची होळी साधेपणानं साजरी करण्याचं आवहान प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. या सूचना पाळत अभिनेत्री सनी लिओनीनं कुटुंबियांसोबत होळी साजरी केली.
यावेळी सनीनं मस्त धमाल करत रंग उधळले. मात्र त्यापेक्षा जास्त ती तिचा पती डेनियलच्या प्रेमात रंगलेली पाहायला मिळाली. एका फोटोमध्ये ती चक्क डेनियलला लिप लॉक करताना दिसली.
होळी सेलिब्रेशनचे फोटो सनीनं सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. या फोटोमध्ये बच्चा पार्टीसुद्धा धमाल करताना दिसत आहेत.
सनीनं शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
सनीनं तिच्या लहान मुलांसोबत सुद्धा मस्त फोटो शेअर केले आहेत.
डेनियलनं सनीवर मस्त रंग उधळल्याचं पाहायला मिळालं.
बबल टब, पिचकारी, रंग आणि बच्चापार्टी.. एकूणच सनीच्या कुटुंबियांनी या होळीला मस्त धमाल केली आहे.
सनीचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत