अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.
आता हीनानं 'Sunset, View and wine ?'असं म्हणत काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ट्रेंडी ड्रेस, डोक्यावर स्टायलिश हॅट, ट्रेंडी गॉगल आणि हातात वाईन हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे.
हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. त्यामुळे या उन्हाळ्यात हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.
सध्या हीना मस्त व्हेकेशनमध्ये धमाल करत आहे.
नुकतंच हीनाला या मनोरंजन विश्वात 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. या गोष्टीचं हीनानं मस्त सेलिब्रेशनही केलं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.
द्राक्षांच्या बागेत हीनानं मस्त फोटोशूट केलं आहे.
हीनाचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.