2020 मध्ये, बरेच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चा होती. महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. जाणून घेऊया 2021 मध्ये कुठले स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतात.
सुहाना खान- सुहाना खान नेहमी लोकांची आवडती स्टार किड ठरली आहे. सुहाना आता मोठी झाली असून, तिनं अॅक्टिंगचे क्लासेससुद्धा केले आहेत. ती मागील काही काळापासून नाटकाशी जोडली गेली आहे. शाहरुख खाननं बर्याच मुलाखतींमध्ये असंही सांगितलं आहे की, सुहाना अॅक्टिंग शिकल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करेल. आता ती यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे.
शनाया कपूर - संजय कपूर यांची मुलगी शनाया आणि सुहाना चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींना अनेकदा सोबत स्पॉटसुद्धा केलं गेलं आहे. आता सुहानासोबत शनायासुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का, हे पाहण्यासारखं असेल.
आर्यन खान- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं आपल्याला अॅक्टिंग करायची नसून चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे, असं मत व्यक्त केलं होतं. मात्र, तरीही शाहरुखच्या चाहत्यांना आर्यनच्या डेब्यूची उत्सुकता आहे.
या व्हिडीओमध्ये तिनं सर्वांची कान उघडणी केली आहे. नेहमी प्रत्येकाच्या नावात आपण गोंधळ करतो. असंच काहीसं आयरा सोबत घडत आहे. आता एक व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या नावाचा उच्चार कसा करायचा हे शिकवलं आहे.