‘मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय’, सुपरस्टार रजनीकांत असं का म्हणाले…
लोकसभा निवडणुका तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्या विधानाचा काय अर्थ लावला जाईल काही सांगता येत नाही. याचाच धागा पकडत रजनीकांत यांनी मनातली भीती बोलून दाखवली.
1 / 5
साऊथ सुपरस्टार रजनीकांत हे कायमच चर्चेत असतात. रजनीकांत यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रजनीकांत यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
2 / 5
नुकताच रजनीकांत यांनी मोठे भाष्य केले. रजनीकांत हे नुकताच चेन्नई येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पोहचले. यावेळी रजनीकांत यांनी मोठे भाष्य केले.
3 / 5
रजनीकांत म्हणाले की, ही वेळ निवडणुकीची आहे, मला श्वास घ्यायलाही भीती वाटते. आता रजनीकांत यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
4 / 5
पूर्वी जेव्हा लोकांना कावेरी हॉस्पिटल कुठे आहे असे विचारले, त्यावेळी लोक म्हणायचे की ते कमल हासनच्या घराजवळ आहे. आता कमलचे घर कुठे आहे, असे विचारले असता ते कावेरी हॉस्पिटलजवळ असल्याचे लोक सांगतात. मी फक्त चर्चांबद्दल बोलत आहे नाही तर उद्या तुम्ही असं छापताल मी कमल हसन यांची खिल्ली उडवली, असं रजनीकांत म्हणाले
5 / 5
आता हे सगळे कॅमेरे बघून मला भीतीच वाटते. ही देखील निवडणुकीची वेळ आहे त्यामुळे मला श्वास घ्यायलाही भीती वाटत असल्यांच रजनीकांत गंमतीने बोलले.