इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात शिल्पे उभारण्यात आलेली आहेत, त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक स्वप्निल राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची रथातून मिरवणूक काढली.
या वेळी उद्घाटन करताना सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा सुशोभीकरणाचे कौतुक करत काम उत्कृष्ट झाले असल्याची पावती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली.
यावेळी या कामाची आणि या मिरवणूकीची चर्चा झाली.
शहरातील बायपासवर वरील मालोजीराजे चौकात उभारण्यात आलेल्या शिल्पांचा फोटो काढण्याचा मोह सुप्रिया सुळे यांना आवरता आला नाही.
उपस्थित फोटोग्राफरचा कॅमेरा त्यांनी हातात घेत या शिल्पाचे अनेक फोटो त्यानी त्यांच्या नजरेने कॅमेरात टिपले.