बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकात दिसणार आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राइज मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार बॉलिवूडचा बादशाहा अभिनेता शाहरुख खान सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.
एवढंच नाही तर प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठं सरप्राइज आहे, ते म्हणजे याच चित्रपटात अभिनेता सलमान खान सुद्धा झळकणार आहे.
जवळजवळ 25 वर्षांनंतर हे तीन खान एकत्र काम करणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात शाहरुख त्याच्या 'DDLJ' या चित्रपटातील राहुलची भूमिका साकारणार आहे, तर सलमान त्याच्या ‘मैंने प्यार किया’या चित्रपटातील प्रेमच्या लूकमध्ये दिसणार आहे.