मारुती-सुझुकीने अजून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं नाही. पण Suzuki च्या 'eWX' या इलेक्ट्रिक कारच मोठी चर्चा आहे. या कारचे डिझाईन कंपनीने पेटंट केले आहे.
ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे. तिची लांबी 3.4 मीटर आहे. ही कार S-Presso पेक्षा पण छोटी आहे. Wagon R चा या डिझाईनवर प्रभाव दिसून येतो.
अर्थात अजून या कारचे उत्पादन करण्यात आलेले नाही. ही एक कॉन्सेप्ट कार आहे. ही कार कधी बाजारात येणार त्याची माहिती समोर आलेली नाही.
ही कार दिसायला एकदम आकर्षक आहे. त्यात कर्व्ह विंडशील्ड देण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या डिझाईनचे पेटेंट केले आहे.
कंपनीने या कारविषयी फारशी माहिती समोर आणलेली नाही. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचे अंतर कापेल, असा दावा करण्यात येत आहे.
ही कार मारुतीच्या eVX ला आणि Tata Tiago EV ला टक्कर देईल. तिची किंमतही कमी असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.