IND vs ENG Semi Final : रोहितकडून विराटल हिरवा कंदील पण कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलला…

| Updated on: Jun 28, 2024 | 4:05 PM

Rahul Dravid on Virat Kohli : टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यापासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर आहे. सेमी फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंड संघावर 68 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली अपयशी ठरल्याचं दिसून आलं. टीम इंडियाने फायनल गाठली पण कोहलीची बॅट संपुर्ण स्पर्धेत थंड राहिली. सामना झाल्यावर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडने कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.

1 / 5
टीम इंडियाने सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 171-7 धावा केल्या होत्या. कॅप्टन रोहित शर्माने 57 धावांची अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. रोहितला सुर्यकुमार यादव याने 47 धावा करत साथ दिली. दोघांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने आव्हानात्मक धावा केल्या होत्या.

2 / 5
टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने दमदार सुरूवात केली होती. कॅप्टन जोस बटलर आणी साल्ट यांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट आणि बुमराहने 2 विकेट घेत सामना फिरवला. इंग्लंड संघ 103-10 धावांवर गुंडाळला. या सामन्यामध्ये विराट कोहलीने चाहत्यांची घोर निराश केली.

3 / 5
विराट कोहलीने एक सिक्स मारत सामन्यात चाहत्यांचा उत्साह वाढवला. पण त्यानंतरच्या बॉलवर विराट बोल्ड झाला. अवघ्या 9 धावा करून तो माघारी परतला. या सामन्यानंतर बोलताना रोहित शर्माने त्याची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं होतं. टीमचे कोच द्रविडनेही कोहलीबाबत भाष्य केलं.

4 / 5
मला वाटते की त्याच्या बॅटमधून लवकरच मोठी खेळी होणार आहे. मला त्याच्या खेळण्याचा अंदाज आवडला. जेव्हा तुम्ही धोकादायक क्रिकेट खेळता तेव्हा यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचं द्रविडने म्हटलं आहे.

5 / 5
आजच्या सामन्यातही कोहलीने वेगाने धावा करण्यासाठी एख खणखणीत षटकार मारला. पण त्यानंतर दुर्देवाने तो आऊट झाला. मला त्याची खेळण्याची पद्धत आवडली तो टीमसाठी वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत आहे हे टीमसाठी चांगलं लक्षण असल्याचं राहुल द्रविड म्हणाला.