टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यासाठी काही तास बाकी आहेत. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमधून कोण फायनलमध्ये जाणार हे सकाळीच समजेल. इंग्लंडचाही पराभव करत टीम इंडिया पराभवाचा बदला व्याजासकट घेण्यासाठी आतुर असणार आहे. या सामन्यात एक खेळाडू असा आहे. जो आपला पहिला टी-20 सामना खेळणार आहे.
Ad
1 / 4
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरा सेमी फायनल सामना 27 जून संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. टीम इंडियाच्या ताफ्यात असे 4 खेळाडू आहेत ज्यांनी एकही सामना इंग्लंडविरूद्ध खेळलेला नाही.
2 / 4
टीम इंडियाचे संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे खेळाडू असे आहेत ज्यांनी एकही सामना खेळलेल नाही. मात्र यामधील एक खेळाडू असा आहे जो इंग्लंडविरुद्ध पहिला T20 सामना सेमी फायनलमध्येच खेळणार आहे.