बॉलिवूडची ‘पिंक’गर्ल तापसी पन्नूनं सुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटलाय. बहिणींसोबत तिनं मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा केली.
बहिणींसोबत ती सध्या मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा करत आहे.
आपल्या मालदीव भटकंतीचे फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना अपडेट्स देते आहे.
मालदीवच्या किनाऱ्यावरचा तापासीचा ‘बिकिनी’ लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
तापसी कायमच तिच्या फॅशनेबल लूकमुळे चर्चेत असते.
सध्या सोशल मीडियाच्या वादांतून दूर, कुटुंबासोबत ती सुट्ट्यांचा आनंद घेते आहे.
मध्यंतरी पायल घोष प्रकरणात तापसीने अनुरागची बाजू घेत, त्याच्या समर्थनार्थ फोटो शेअर केला होता.
अनुभव सिन्हाच्या ‘थप्पड’ चित्रपटात झळकलेली तापसी लवकरच तिच्या ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘शाबास मिठ्ठू’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.