Marathi News Photo gallery Taarak mehta ka ooltah chashmah do you know how much honorarium your beloved artists get for one episode
Photo : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ एका भागासाठी तुमच्या लाडक्या कलाकारांना किती मानधन मिळतं माहितीय?
VN |
Updated on: May 05, 2021 | 1:18 PM
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'नं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. (‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ Do you know how much honorarium your beloved artists get for one episode?)
1 / 10
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'नं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. एवढंच नाही तर यातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. जेठालाल आणि बबिता जी यांच्या गोड-गोड बोलण्यानं प्रेक्षकांचं चांगचल मनोरंजन होतं. यामध्ये प्रत्येक कलाकाराची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. या शोमध्ये बरेच कॅरेक्टरची रिप्लेसमेंट्स झाली आहे, मात्र टीआरपीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
2 / 10
या शोमध्ये दिशा वाकाणी सध्या अनुपस्थित असूनही बाकीचे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता हे काम करताना तुमच्या लाडक्या कलाकारांना किती पगार मिळतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आज आम्ही तुम्हाला या शोच्या काही पात्रांच्या पगाराबद्दल सांगणार आहोत.
3 / 10
श्याम पाठक- श्याम हे या शोमध्ये पोपटलालची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करते. शोमध्ये ते एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसतात. ते प्रति भाग 28 हजार रुपये पगार घेतात.
4 / 10
कुश शाह - कुश या शोमध्ये गोलीची भूमिका साकारतोय. त्याची टप्पू सेनाशी चांगलीच मैत्री दिसून येते. त्याला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. तो प्रति भाग 8 हजार रुपये मानधन घेते.
5 / 10
मंदार चांदवडकर- या शोमध्ये आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारत असलेले मंदार चांदवडकर महिन्याला 20-21 दिवस शूटिंग करतात. तर ते प्रत्येक भागासाठी सुमारे 30 हजार रुपये घेतात.
6 / 10
मुनमुन दत्ता – मुनमुन या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारत आहे. अय्यरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसते. प्रत्येक भागासाठी मुनमुन अंदाजे 30 हजार रुपये घेते. महिन्याला ती 16-17 दिवस शूटिंग करते.
7 / 10
राज अनादकट- शोमध्ये राज टप्पूची भूमिका साकारत आहे. हा जेठालाल यांचा मुलगा आहे. प्रत्येक भागासाठी तो 10 हजार रुपये घेतो. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यानं भाव्या गांधींची जागा घेतली आहे.
8 / 10
अमित भट्ट- अमित भट्ट या शोमध्ये 'चंपक चाचा' ही भूमिका साकारत आहेत. हे 'जेठालाल' यांचे बाबूजी आहेत. प्रत्येक भागाच्या शूटिंगसाठी ते 35 हजार रुपये घेतात. तर एका महिन्यात 21 दिवस ते काम करतात. बाबूजींनी आपल्या व्यक्तिरेखेतून लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.
9 / 10
दिलीप जोशी- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे मुख्य पात्र‘ जेठालाल’ दिवसाला 50 हजार रुपये मानधन घेतात. ते एका महिन्यात 25 दिवस काम करतात. तर दिलीप जोशी यांनी अनेक चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
10 / 10
शैलेश लोढा- शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश एका एपिसोडसाठी 32 हजार रुपये घेतात. त्यांची आणि 'जेठालाल' मैत्री चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते एका महिन्यात 20 ते 21 दिवस काम करतात.