गणेश चतुर्थीला घ्या देशातील या नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे दर्शन, होतील सर्व इच्छापूर्ण

| Updated on: Aug 30, 2024 | 10:52 PM

गणेशोत्सवाचे आगमन अगदी तोंडावर आले आहे.मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवाला एक थोर परंपरा आहे. अनेक जणांच्या घरात दीड दिवसांच्या गणेशाचे आगमन होत असते. तेव्हा घरातील वातावरण या काळात मोठे पवित्र होणार आहे. या काळात घराघरात आरत्यांचा आवाज घुमत असतो. बच्चे कंपनीची तर धमाल सुरु असते. यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दरम्यान देशातील काही जागृत गणपती मंदिरे आहेत. येथे जाऊन आपण गणपती दर्शन घेऊन या देवतेचे आशीर्वाद घेऊ शकतात. येथे आपण प्राचीन आणि प्रसिद्ध गणेश मंदिरांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.

1 / 8
1-सिद्धिविनायक मंदिर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरातील देशातील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी मानले जात आहे. हे मंदिर 1801 मध्ये उभारण्यात आले होते.मुंबईला तुम्ही जेव्हा भेट द्याल त्यावेळी या दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील जागृत गणेशाचे दर्शन घेऊन आशीवार्द घेऊ शकता.

2 / 8
2-त्रिनेत्र गणेश, राजस्थान  त्रिनेत्र गणेश हे श्री गणेशाचे मंदिर राजस्थानातील सर्वात चर्चित टूरिस्ट डेस्टीानेशन रणथंबोर नॅशनल पार्कच्या जवळ स्थित आहे.या मंदिराचे एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे दर्शनाला येण्यापूर्वी भाविक गणेशाला चिठ्ठी पाठवितात. या चिठ्ठ्यांना स्वत:पोस्टमन पोहचवितात. नवस पूर्ण झाल्यानंतर येथे येऊन  लोक नवस फेडतात. मंदिराचा इतिहास 800 वर्षे जुना आहे.येथील पिंक सिटी जयपूरहून  काही किलोमीटर अंतरावर आहे. दिल्लीहून आपण कारने आपण पोहचू शकता. ट्रेनने येणाऱ्यांना येथून इतर वाहनांनी जयपूरहून येथे पोहचता येते.

3 / 8
3-खजराना गणेश मंदिर, इंदौर गणेशोत्सावा दरम्यान मध्य प्रदेशातील गणपती मंदिरात देखील तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. देशातील एका श्रीमंत देवस्थानापैकी हे एक मंदिर मानले जाते. या गणेशाला नवसाला पावणारा मानला जाते. आणि नवस पूर्ण झाल्यानंतर गणेशाच्या पाठीवर स्वास्तिक तयार केले जाणार आहे. येथील गणेशाची प्रतिमा तीन फूट उंचीची आहे.

4 / 8
4-चिंतामण गणपती, उज्जैन उज्जैन येथील प्राचीन मंदिरापैकी चितामण गणपती म्हटला जातो. चिंतामन गणेश मंदिरात भगवान श्री गणेशाचे तीन रुपे एक साथ विराजमान आहेत. चिंतामण गणेश, इच्छामन गणेश आणि सिद्धिविनायक अशी ही तीन साजरी रुपे आपल्याला मोहवतात. येथे दर्शन केल्यानंतर भाविक मंदिराच्या पाठी उल्टा स्वास्तिक तयार करतात आणि नवस मागतात. जेव्हा त्यांचे नवस पूर्ण होते तेव्हा ते पुन्हा येतात गणेशाचे दर्शन करतात आणि मंदिराच्या पाठी सरळ स्वास्तिक चिन्ह तयार करतात.

5 / 8
5-गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी महाराष्ट्राच्या कोंकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशाचे हे मंदिर प्रसिद्ध असून ते नवसाला पावते.येथील गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.येथील मूर्ती नैसर्गिक आहे.ही गणेश मूर्ती सुमारे 400 वर्षे जुनी आहे.

6 / 8
6-गणेश टोक मंदिर सिक्किमची राजधानी गंगटोकमधील हे गणेशाचे टोक मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. गणेश टोक मंदिराजवळील परिसर निसर्गरम्य आहे. तर गणपती मंदिरातील गर्भगृहातील गणेश प्रतिमा विशाल आणि सुंदर आहे. या मंदिरातील वातावरणाने मन प्रसन्न होते. आणि एक सुखद अनुभव आपल्याला मिळतो.

7 / 8
7-गढ़ गणेश मंदिर, जयपुर या मंदिरातील गणेशाती प्रतिमा एक मानवाच्या रुपात आहे.राजस्थानच्या जयपुरच्या डोंगरावरील या मंदिरातील भगवान गणेशाची मूर्ती सोंड असणारी नाही. या मंदिराची स्थापना राजस्थानचे एक राजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी केली होती. दिल्लीच्या सराय रोहिल्ला स्टेशन, नई दिल्ली किंलवा जुनी दिल्लीहून जयपुरची ट्रेन सहज मिळते. जयपुरहुन सवाई माधोपुर येथे येऊन या मंदिराचे दर्शन करता येते.

8 / 8
8-कॅनॉट प्लेस येथील गणेश मंदिर दिल्लीतील प्रसिद्ध  कॅनॉट प्लेस येथे एक गणेश मंदिर देखील आहे. अनेकांना त्याबद्दल फारसे माहीत नाही.  येथे दक्षिण भारतीय मूळ असलेले पुजारी गणेशाची पूजा करत असतात. येथे इतर देवतांची देखील प्रतिष्ठापना केलेली आहे.