दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज (VJ Chitra Kamraj) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत
चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स (Pandian Stores) या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती
चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरु केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं.
चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता.
मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवलं, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. याशिवाय चिन्ना पापा पेरिया पापा, डार्लिंग डार्लिंग अशा काही मालिकाही तिने केल्या.
चित्रा उत्तम नृत्यांगनाही होती. ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. जोडी अनलिमिटेड या शोमध्ये ती उपविजेतेपद पटकावलं होतं.