टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही टीममध्ये वन डे आणि टी- 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीमबाहेर असा एक युवा खेळाडू आहे जो टीम इंडियाच्या वन डे आणि टी-20 फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू झाला होता. मात्र आता तो संघाबाहेर असून कमबॅकची वाट पाहत आहे.
आपल्या वाढदिवसादिवशी हा खेळाडू शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी गेला होता. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इशान किशन आहे. 2024 मध्ये इशानने एकही सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने वार्षिक केंद्रीय करारामधून त्याला बाहेर करण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
इशान किशन याने वन डे मध्ये टीम इंडियाकडून द्विशतक मारलं आहे. पॉकेट डायनॅमो म्हणून ओळखला जाणारा इशान आता 26 वर्षांचा झाला आहे. इन्स्टावर त्याने साई बाबांचं दर्शन घेतानाचे फोटो पोस्ट केलेत.