फादर्स डे दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला तुम्हाला वडिलांसोबतचा किंवा फक्त आपल्या वडिलांचा फोटो ठेवलेला होता. काहींचे वडील आता ह्यात नाहीत पण प्रत्येकजण आपल्या वडिलांसोबत भावनिकदृष्टीने कायम जोडलेला असतो. अशाच प्रकारे टीम इंडियातील खेळाडूनेही अशाच प्रकारे आपल्या वडिलांसोबतची फोटो पोस्ट केली होती.
टीम इंडियाच्या खेळाडूने आपल्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोवर संबंधित खेळाडूच्या पत्नीने कमेंट करताना धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केलेत. पाहा काय म्हणाली...
बाहेर बायांचा नाद असल्याने त्याने स्वत:च्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही. आता ते गेल्यावर त्यांचा फोटो टाकून ढोंग घेत असल्याचं या खेळाडूच्या पत्तीने म्हटलं आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. शमीच्या पत्नीने हसीन जहाँने निशाणा साधला आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ दोघे वेगवेगळे झाले असून त्या दोघांना एक मुलगी आहे.
हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी दोघांमध्ये वाद आहेत. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबावर छळ केल्याचे आरोप केले असून हे प्रकरण कोर्टात आहे.