टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खतरनाक कामगिरी करणारा हा खेळाडू आता संघापासून दूर आहे. क्रीडाप्रेमी तो संघात कधी कमबॅक करतो याची वाट पाहत आहे.
टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. या प्रवासामध्ये या खेळाडूने मोलाची भूमिका निभावली होती. त्याच्याकडून ही कामगिरी झाली नसती तर टीम इंडियासाठी प्रवास अवघड राहिला असता.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. मोदम्मद शमी याने वर्ल्डकपमध्ये केलेली कामगिरी कोणताही भारतीय विसरला नाही. मोहम्मद शमी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो व्हायरल होत आहे.
मोहम्मद शमी याचा योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते सत्कार झाला. शमीने इन्स्टावर याबाबतची माहिती देत, योगी आदित्यनाथ यांच्या हातून सन्मान होणं हा एक चांगला क्षण होता.
दरम्यान, मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये सात सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. शमी यंदा आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळताना दिसणार नाही. टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे