Photo | ऑस्ट्रेलियावर दौऱ्यावर असताना वडीलांचं निधन, वर्णद्वेषी टीका, विराटच्या आवडत्या मोहम्मद सिराजची संघर्षकथा

| Updated on: Mar 13, 2021 | 3:20 PM

मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj today 27th birthday) आज वाढदिवस आहे. त्याने वयाची 27 वर्ष पूर्ण केली आहेत.

1 / 5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी पदार्पण केलं. त्याने या दौऱ्यात शानदार कामगिरी केली. मोहम्मदचा आज (13 मार्च) वाढदिवस आहे. त्याने वयाची 27 वर्ष पूर्ण केली आहेत.

2 / 5
सिराजचे वडील हे ऑटोचालक होते. आपल्या मुलाला क्रिकेपटू बनवण्याचं स्वप्न होतं. सिराजच्या कुटुंबियांच्या संघर्षामुळे तो  आज यशस्वी क्रिकेटपटू बनला आहे. सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे नवी ओळख मिळाली.

3 / 5
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी सिराजच्या वडीलाचं निधन झालं. मात्र त्यांने मायदेशी न परतता ऑस्ट्रेलियात आपल्या सहकाऱ्यांसोबत राहिला. सिराजला या दौऱ्यात वडीलांची उणीव जाणवत होती. वडीलांच्या आठवणीने त्याला राष्ट्रगीतादरम्यान अश्रू अनावर झाले होते.

4 / 5
भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. सिडनी कसोटी दरम्यान सिराजला वर्णद्वेषी टीकांचा सामना करावा लागला.  त्यानंतर सामना थांबवण्यात आला होता. मात्र सिराजने या सर्व प्रकाराचा आपल्या कामगिरीवर कोणताच परिणाम होऊ दिला नाही.

5 / 5
मोहम्मदने 5 कसोटींमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.