Marathi News Photo gallery Team india former player yusuf pathan in loksabha election 2024 candidate for TMC in west bangal marathi news
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वर्ल्ड कप विनर खेळाडूची एन्ट्री, मोदींना करणार चॅलेंज?
लोकसभा निवडणुकीमध्ये पठाण कुटुंबातील टीम इंडियाच्या माजी खेळाडूने दंड थोपटले आहेत. या खेळाडूने थेट मोदींच्या विरोधात भूमिका घेतली असून जोरदार चर्चा होत आहे.
1 / 5
आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्व पक्ष बाहुबली उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने यंदा एनडीए 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी एकत्र येत तगडे उमेदवार उतरवणार आहे.
2 / 5
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपली 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी युसूफ पठाण याच्या नावाचा समावेश आहे.
3 / 5
युसूफ पठाण हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बहरामपूर या मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
4 / 5
टीम इंडियाने 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी वर्ल्ड कप विनर युसूफ पठाण हासुद्धा भाग होता. इतकंच नाहीतर त्याला 2007 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो फायनलमध्ये आला होता.
5 / 5
दरम्यान, येत्या निवडणुकीमध्ये युसूफ पठाण हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा होती. आता स्पष्ट झालं आहे की तो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे.