WhatsApp : व्हॉट्सॲप खातं सुरु करण्यासाठी मोबाईल नंबरची गरज नाही! कसं ते समजून घ्या
स्मार्टफोन असलेल्या मोबाईलधारकांच्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअॅप हे असतं. पण अजूनही काही जण व्हॉट्सॲपकडे पाठ करून आहेत. पण तुम्ही मोबाईल नंबर न देता व्हॉट्सॲप खातं सुरु करू शकता.
1 / 8
व्हॉट्सॲप खातं सुरु करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याशिवाय खातं उघडताच येत नाही. पण तुम्ही एका युक्तीद्वारे मोबाईल नंबर न देता खातं उघडू शकता. कसं ते जाणून घ्या
2 / 8
मोबाईल नंबर असलेलं व्हॉट्सॲप खातं डोकेदुखी ठरू शकते. ग्रुपमध्ये अॅड केलं की मेसेज पाठवून इतर सदस्य त्रास देतील अशी भीती काही जणांना असते. पण तुम्ही मोबाईल नंबर न वापरता व्हॉट्सॲप वापरू शकता.
3 / 8
कोणतंही व्हॉट्सॲप खातं उघडण्यासाठी फोन नंबरची आवश्यकता असते. पण तो तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल नंबरची तशी गरज नाही. जर तुम्हाला काही जण व्हॉट्सॲपवर त्रास देत असतील तर जुना नंबर काढून टाका.
4 / 8
व्हॉट्सॲपवर तुमचा मोबाईल नंबर लपवण्याचा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप खातं सुरु करण्यासाठी तुम्ही लँडलाइन नंबर देऊ शकता. लँडलाइन नंबरसह व्हॉट्सॲप खातं उघडू शकता.
5 / 8
अँड्रॉईडवर प्लेस्टोर ओपन करा आणि व्हॉट्सॲप डाउनलोड करा. तसेच ते ओपन करा.
6 / 8
तुमचा लँडलाईन नंबर त्या जागी व्हेरिफिकेशनसाठी टाका आणि ओके करा. व्हॉट्सअॅप विचारेल तुम्ही टाकलेला नंबर योग्य आहे की नाही. तेव्हा ओके असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
7 / 8
व्हॉट्सॲप तुम्हाला मंजूर असलेल्या नंबरवर पडताळणी कोड पाठवेल. पण लँडलाईनवर मेसेज येऊ शकत नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सॲपवर कॉल पर्याय निवडून कोड मिळवा. यासाठी तुम्हाला 90 सेकंद प्रतीक्षा करावी लागेल.
8 / 8
90 सेकंदावर कॉल करा या पर्यायावर टॅप करा. लँडलाईनवर कॉल आल्यानंतर उचला आणि सांगितलेला कोड टाका. त्याची पुष्टी करा आणि पुढे जा. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप सुरु होईल.