मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे.
दूबईमध्ये घमाल करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत आहे.
आता तिनं मस्त सूर्यास्त होताना फोटो टिपला आहे. या फोटोमध्ये तेजस्विनीचं सौंदर्य अधिकच फुलून आलेलं दिसत आहे.
'Her Heart was made of Liquid Sunsets !!!' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळी तेजस्विनी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.