मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते.
ती सोशल मीडियावर फोटो शेअर कर नेहमीच आपल्या हटके कपड्यांनी चाहत्यांची मनं जिंकते.
अभिनयाप्रमाणेच तेजस्विनी तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळे चर्चेत असते. या फोटोमध्येसुद्धा तिनं स्वत:च्या ब्रँडचे कपडे परिधान केले आहेत.
या पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.