हे आहेत जगातील 5 सर्वात ताकदवान पासपोर्ट, अमेरिकेचे नाव यात नाही !
ऑक्टोबर 2024 मध्ये जगातील सर्वात ताकदवान पासपोर्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या यादीत सुपरपॉवर अमेरिकेचे नाव पहिल्या पाच स्थानात नाही. मग कोणत्या पाच देशाचे पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहेत हे पाहूयात....
1 / 5
सिंगापूर - जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टमध्ये सिंगापूरचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे. तुमच्या जवळ जर सिंगापूरचा पासपोर्ट असेल तर तुम्हाला 195 देशात आरामात प्रवास करता येईल
2 / 5
जपान - दुसऱ्या क्रमांक अनेक देशांचे पासपोर्ट आहेत. यात फ्रान्स,जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार या देशांच्या पासपोर्टवर आपल्याला 192 देशात व्हीसा शिवाय आरामात प्रवेश मिळेल.
3 / 5
डेनमार्क - तिसऱ्या क्रमांकावर देखील अनेक देशांच्या पासपोर्टचा डंका आहे. यात ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, फिनलॅंड, आयरलॅंड, लक्जमबर्ग,नेदरलॅंड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन सामील आहेत. या देशांच्या पासपोर्टवर 191 देशांमध्ये व्हीसा शिवाय प्रवेश मिळेल..
4 / 5
युनायटेड किंगडम- चौथ्या स्थानावर 5 देश आहेत.बेल्जियम, न्यूझीलॅंड, नॉर्वे,स्वित्झलॅंड आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. या देशांच्या पासपोर्टवर 190 देशांचा व्हीसा शिवाय प्रवास करता येतो.
5 / 5
पोर्तुगाल - या यादीत पाचव्या स्थानावर 2 देशांचे नाव आहे. या देशात ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल या देशांचा समावेश आहे. या देशांच्या पासपोर्टवर 189 देशांचा प्रवास व्हीसा शिवाय करता येतो.