काय सांगता ? भोरमध्ये लग्नासाठी बैलगाडीतून निघाले वऱ्हाड …
मी शेतकऱ्याची कन्या आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी व त्याचा वाढ चालेला ऱ्हास टाळण्यासाठी आम्ही बैलगाडीतून वऱ्हाड विवाहस्थळी नेले. या उपक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नववधूने दिली आहे.
1 / 5
भोर तालुक्यातील उत्रौली गावात,सध्या एका लग्नाच्या वऱ्हाडाची चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाण्यासाठी सजवलेली कार किंवा इतर वाहनानी न जाता वधू थेट पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाड घेऊन कार्यालयात पोहचली.
2 / 5
मी शेतकऱ्याची कन्या आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी व त्याचा वाढ चालेला ऱ्हास टाळण्यासाठी आम्ही बैलगाडीतून वऱ्हाड विवाहस्थळी नेले. या उपक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नववधूने दिली आहे.
3 / 5
नव वधू सजविलेल्या बैलगाडीतून वऱ्हाड्यासह कासरा हातात घेतला. बैलगाडीचे सारथ्य करीत लग्न स्थळी पोहचलेली वधू कौतुकाचा विषय ठरलीयं आहे.
4 / 5
नऊवारीसाडी, डोक्याला फेटा घालत थेट हातात बैलांचा कसारा घेतलेली नववधूही , बरोबरच्या करावल्याही रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
5 / 5
बैलांच्या गळ्यात खळाळणाऱ्या घंटा , पाठीवर टाकलेल्या झुली, एकामागू एक यापद्धतीने निघालेल्या बैलगाडया जुन्या पारंपरिक पद्धतीच्या लग्नाची आठवण करून देताना दिसत होत्या.