मुन्नाभाई एमबीबीएस, पीके सारख्या अनेक अप्रतिम चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आज 58वा वाढदिवस आहे.
त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1962 ला नागपूरमध्ये झाला होता. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते घरातून अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन निघाले होते.
अभिनेता बनण्याचं स्वप्न बाळगत त्यांनी पुण्यातील 'फिल्म अँड टेलीविजन इन्स्टिट्यूट'मध्ये प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमात त्यांचा कल दिग्दर्शनाकडे वळला.
राजकुमार हिरानी यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आणि यात त्यांना चांगलंच यश मिळालं. त्यानंतर लगेच 2006 मध्ये त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि अपेक्षेप्रमाणे या चित्रपटानंदेखिल बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली.
त्यानंतर 'थ्री इडियट्स', 'संजू' आणि 'पीके' यांसारख्या चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
या पाच चित्रपटांसाठी राजकुमार यांना भरपूर अवॉर्ड्स मिळाले, एवढंच नाही तर त्यांनी 11 फिल्मफेअर अवार्ड्ससुद्धा आपल्या नावे केले आहेत.