Gondia : वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस, पाहा मनमोहक फोटो!
वसंत ऋतू लागताच गोंदियामध्ये पिवळ्या पळसाला फुल यायला सुरूवात झाली आहे. मात्र याअगोदर अनेकांनी वेगवेगळ्या रंगाची पळसाची फुले बघितली असतील पण पिवळ्या रंगाच्या पळसाची बातच न्यारी आहे. पळसाला पाने तीन ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेलच. मात्र, पळसाची मनमोहक फुले फार कमी लोकांनी बघितली असावीत.
1 / 5
वसंत ऋतू लागताच गोंदियामध्ये पिवळ्या पळसाला फुल यायला सुरूवात झाली आहे. मात्र याअगोदर अनेकांनी वेगवेगळ्या रंगाची पळसाची फुले बघितली असतील पण पिवळ्या रंगाच्या पळसाची बातच न्यारी आहे.
2 / 5
पळसाला पाने तीन ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेलच. मात्र, पळसाची मनमोहक फुले फार कमी लोकांनी बघितली असावीत.
3 / 5
गोंदिया जिल्हामध्ये विविध प्रजातीची दुर्मिळ वृक्षे आपल्याला बघियला मिळतील. याच गोदिंया जिल्हातील ही पळसाची झाडे पाहा. या झाडांवर अगदी मनमोहक आणि विविध रंगाची पळसाची फुल आली आहेत.
4 / 5
गोंदियाचे तत्कालीन जिलाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मिळ वृक्षाचा शोध घेत गोंदिया जिल्हात देखील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा पिवळा आणि पांढरा पळस आहे हे शोधून काढले.
5 / 5
सध्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने बाहेर तोंडही काढू वाटत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, पळसाचे झाड पाहिले सकारात्मक विचार तर मनी रुजतातच पण ओसाड माळरानावर असलेलं झाड मन प्रसन्नच करते.