वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन यंदा द्राक्ष महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष या ठिकाणी घेऊन शेतकरी आले आहेत...नागरिक देखील या महोत्सवात येऊन थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत आहेत.
योग्य दर मिळावा हीच अपेक्षा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. आता किमान दर तरी चांगला मिळावा ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक संकटावर मात केल्यानंतर हे उत्पादन पदरी पडले आहे. त्याचे चीज व्हावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सांगली द्राक्षाचे आगार नाशिक नंतर सांगलीमध्ये द्राक्षाचे क्षेत्र आणि उत्पादकताही आहे. शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी हा महोत्सव निमित्त ठरत आहे. त्यामुळे ग्राहक थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात येत असल्याने दर्जेदार माल शेतकऱ्यांना मिळतो. या दोन्ही घटकांमधील दलाली कमी होते. शिवाय शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतात.
द्राक्षांचे अनेक प्रकार: निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले असले तरी कोल्हापूरच्या या महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष दाखल झाले होते. वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला तर ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. नागरिक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत होते.