…तर आम्ही उपोषण स्थगित करतो, शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हाकेंची घोषणा
OBC Reservation : ओबीसी आरक्षण बचावसाठी गेल्या 9 दिवसांपासून सुरु असणारे उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे.
1 / 5
ओबीसी आरक्षण बचावसाठी वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री ता अंबड येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण करत आहेत
2 / 5
ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सरकारने सांगावे. आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत आम्ही असचं उपोषण सुरु ठेवणार असं हाके यांनी म्हटलं होतं
3 / 5
मात्र आज सरकारचे शिष्टमंडळ हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या पत्राचं वाचन केलं
4 / 5
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत अनेक मागण्या पूर्ण झाल्यात. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. अधिवेशन काळात इतर मागण्यांवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
5 / 5
आपलं उपोषण 10 दिवसांपासून सुरु. 1 ते 2 मागण्या सोडल्या तर बाकी मागण्या पूर्ण करण्याचं सरकारचं आश्वासन. त्यामुळे आम्ही आमचं उपोषण स्थगित करतो असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे