रवींद्र जडेजानं जोरदार षटकार ठोकून चेन्नई सुपर किंग्जला सामना जिंकून दिला. मॅच जिंकण्याच्या आनंदात जडेजानं स्वत:च्या पाठीवर हात फिरवत वेगळ्याच पद्धतीनं आनंद व्यक्त केला.
जडेजानं मारलेल्या या सिक्सरचं सर्वत्र कौतुक होत असून त्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर मीम्स बनवण्यात आल्या आहेत.
एवढंच नाही तर ट्विटरवर #Jadeja ट्रेंडही सुरू झाला आहे.
चेन्नईची टीम जिंकल्यानं चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.
सोशल मीडियावरील धमाल मीम्सवरून ते सहज लक्षात येतं.