Chandrayaan 3: मिशन चंद्रयान-3 यशस्वी करणारे खरे हिरो, मोहीम फत्ते करण्यात या शास्त्रज्ञांचा हात; जाणून घ्या त्यांच्याबाबत

| Updated on: Aug 23, 2023 | 7:42 PM

Chandrayaan-3 Team: चंद्रयान 3 चंद्रावर उतरताच भारताने इतिहास रचला आहे. चंद्रयान 3 मोहिमेसाठी 3 वर्षे 9 महिने आणि 14 दिवसांचा कालावधी लागला. जाणून घ्या मिशनमागे कोण कोण होतं ते..

1 / 6
चंद्रयान 3 नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करून इतिहास रचला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. या मिशनसाठी गेल्या अनेक वर्षांपासून इस्रोची टीम काम करत होती. चंद्रयान 2 मिशनपेक्षा हे मिशन खूपच वेगळं होतं. चंद्रयान 3 मिशनसाठी 3 वर्षे 9 महिने आणि 14 दिवस इतका कालावधी लागला. चला जाणून घेऊयात हे मिशन यशस्वी करण्यासाठी कोणी कशी मेहनत घेतली ते..

2 / 6
डॉ. एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष असून या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मोहिमेसाठी बाहुबली रॉकेटच्या व्हेईकल 3 चं डिझाईन केलं होतं. या माध्यमातून चंद्रयान 3 लाँचिंग करण्यात आलं होतं. चंद्रयान 3 नंतर त्यांच्याकडे आणखी दोन मोठ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. यात आदित्य एल1 आणि गगनयान यांचा समावेश आहे.

3 / 6
पी वीरमुथुवेल या मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कमान सांभाळत आहेत. 2019 मध्ये त्यांच्याकडे चंद्रयानाची जबाबदारी सोपण्यात आली होती. तामिळनाडूतील विल्लुपुरम येथे राहणारे पी वीरामुथुवेल यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी घेतली आहे.

4 / 6
विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आणि एरोस्पेस अभियंता डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चंद्रयान-3 शी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल (GSLV) मार्क-III तयार करण्यात आले. चंद्रयान-2 च्या अपयशानंतर डॉ. उन्नीकृष्णन यांनी त्यातील उणिवा समजून घेत नवीन मोहिमेच्या यशासाठी रणनीती तयार करण्याचे काम केले.

5 / 6
एम शंकरन हे यूआरएससी उपग्रह केंद्राचे (URSC) संचालक आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची आणि डिझाइन करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली एक टीम सॅटेलाइट कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट वर्किंग, हवामान अंदाज आणि ग्रहांचा शोध घेण्याची जबाबदारी पार पाडत होते. एम शंकरन यांनी 1986 मध्ये तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. यानंतर ते इस्रोच्या उपग्रह केंद्रात रुजू झाले. त्यांना 2017 मध्ये इस्रोचा परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड आणि 2018 मध्ये इस्रो टीम एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

6 / 6
डॉ. कल्पना या चंद्रयान-3 मिशनच्या उपप्रकल्प संचालक आहेत. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी या मिशनवर काम केले. गेल्या 4 वर्षांपासून त्या या प्रकल्पावर काम करत आहेत. डॉ. कल्पना सध्या युएसआरसीच्या उप प्रकल्प संचालक आहेत.