गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.
अशा परिस्थितीत समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत.
जवळजवळ 4 मीटरपर्यंत या लाटा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
समुद्राला भरती येणार
तसेच मुंबईत 102 किमी वेगानं वारे वाहत आहेत. मुंबई सी-लिंग बंद करण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे.