Marathi News Photo gallery The students of Nagpur held a freedom march, organized by the Municipal Corporation at Constitution Chowk
Photo Nagpur Students : नागपुरातील विद्यार्थ्यांनी केला स्वातंत्र्याचा जागर, मनपातर्फे संविधान चौकात आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान चौकात शाळकरी मुलांनी पथनाट्याच्या माध्यमाने स्वातंत्र्याचा जागर केला.
नागपुरातील विद्यार्थ्यांनी केला स्वातंत्र्याचा जागर
Follow us on
हे सुद्धा वाचा
या कार्यक्रमाला मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना आणि राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान चौकात शाळकरी मुलांनी पथनाट्याच्या माध्यमाने स्वातंत्र्याचा जागर केला.
टाटा पारसी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरची परिस्थितीचे वर्णन करणारे पथनाट्य प्रस्तुत केले. त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले.
मनपाच्या दुर्गा नगर शाळातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. लालबहादूर शास्त्री शाळातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण आणि सामाजातील वाईट प्रथा, चालीरीती वर पथनाट्य सादर केले.
रामदासपेठ येथील सोमलवार शाळेचा विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत शालेयबाह्य मुलांची अवस्था आणि शिक्षणाचा अधिकार संबंधात पथनाट्य सादर केले.