अकोला : सर्वेच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आता जिल्ह्यानिहाय बैलगाड्यांच्या शर्यती पार पडत आहे. मात्र या दरम्यान, शर्यतीचा थरार आणि उपस्थित शेतकऱ्यांचा उत्साह काही औरच असतो. असाच थरार अकोला जिल्हातल्या घुसरवाडीतल्या काळ्या मातीत रंगला होता. ढवळ्या पवळ्या सर्जा राजाची जोडी जिंकली पाहिजे म्हणून सर्व ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या धुर कऱ्याचा जोश आणि उत्साह हा पाहण्यासारखा होता. बैलगाडी शर्यचतीचे अनेक उद्देश आहेत. ग्रामीण भागातल्या शेतीशी संबंधित अर्थकारणाला यामुळे चालना मिळते शिवाय बैलांची खरेदी विक्री यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. घुसरवाडीत आयोजित या शर्यतीमध्ये सर्व उद्देश साध्य झाल्याचे चित्र होते.