यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पाचे आगमन लांबले असले तरी, पुढच्या सप्टेंबर महिन्यात घरोघरी गणरायाचे विराजमान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे. गणेशोत्सवजवळ आल्याने मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. कच्चा माल महागल्यामुळे 20 ते 25 टक्के गणेशमूर्तीचे दरही वाढणार आहेत.
गणेशोत्सव जवळ आला आहे, बुलढाणा जिल्ह्यात घरोघरी व सार्वजनिक मंडपात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात भक्ती भावाने बाप्पाची प्रतिष्ठापना होते.
त्यामुळे सर्व ग्रामीण परिसरातून लहान, मोठ्या आकारातील मूर्तींना मागणी असते. कारखान्यात गणेशमूर्तींचे काम सुरू झाले असून कारखान्यांत मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे.
मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू आहे. तर यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत. याची झळ गणेशभक्तांना सोसावी लागणार आहे. जिल्ह्यातील सव येथील मूर्ती कारखान्यात तयार होणाऱ्या मूर्तीना मध्य प्रदेश, पुणे, मुंबई,नांदेड आदी जिल्ह्यांतून मागणी असते. मात्र यंदा कच्चा माल महागल्याने मूर्ती सिद्ध महागणार असणार मूर्तिकार सांगतात.