Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात, नवीन फोटो आले समोर

| Updated on: Jun 24, 2023 | 11:39 PM

अयोध्येत राम मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून नवे फोटो समोर आले आहे. मंदिराच्या भिंती आणि छताचे फोटो समोर आले असून यावरून मंदिराची भव्यता दिसते.

1 / 8
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 8
मंदिरातील दगडावर कोरलेली सुंदर नक्षी लक्ष वेधून घेते. तसेच मंदिराची भव्यता फोटोतून समोर आली आहे.

3 / 8
मंदिराचं आतापर्यंत झालेलं काम पाहता अद्भुत वास्तुकलेचं दर्शन होत आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत मंदिराचं काम पूर्ण होईल.

4 / 8
2024 साली मकर संक्रांतीला भगवान रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापना केली जाईल.

5 / 8
चंपत राय यांच्या मते, मंदिर निर्मितीचं कार्य वेगाने सुरु आहे. मंदिराचा ढाचा जवळपास तयार आहे.

6 / 8
मंदिराचं काम या वर्षाच्या शेवटी पूर्ण होईल. दिवसरात्र यासाठी काम केलं जात आहे.

7 / 8
श्रीरामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र परिसरात भगवान रामाच्या तीन मूर्ती घडवल्या जात आहेत.

8 / 8
कोणती मूर्ती गर्भगृहात स्थापित केली जाईल याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. पण तीन पैकी एक मूर्ती गाभाऱ्यात स्थापित केल्यानंतर उर्वरित दोन मूर्ती मंदिर परिसरात स्थापित केल्या जातील.