स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मरणार्थ घणसोली नवी मुंबई येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.
नवी मुंबई व मुंबई येथील शिराळा व वाळवा तालुक्यातील देशमुख साहेब प्रेमी संघटनेच्या वतीने या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
या मैदानामध्ये नामवंत मल्लाच्या कुस्त्या पार पडल्या. यावेळी भाजप नेते सत्यजीत देशमुख, अनिकेत देशमुख, डी आर अण्णा जाधव त्याचबरोबर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
चटकदार कुस्त्यांचा आंनद मुंबई येथील ग्रामस्थांनी घेतला.
या कुस्ती मैदानाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर या कुस्ती मैदानाचा आनंद घेतला.