राजधानी दिल्लीसोबतच देशात आजपासून सिनेमागृह सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 6 महिने सिनेमागृह बंद आहेत आणि बऱ्याच कालावधीनंतर सिनेमागृहे सुरू होत असल्याने सिनेप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत आहे. मात्र, हे सिनेमागृहात जाताना प्रेक्षकांना सॅनिटायझेशनपासून ते सोशल डिस्टन्सिंगपर्यंतच्या नियमांचं काटेकोरपालन करावं लागत आहे.
सिनेमागृह सुरू झाल्यानं आता दररोज सिनेमागृहांचं पूर्णपणे सॅनिटाइझेशन करण्यात येणार आहे. सीटपासून ते प्रत्येक कोपऱ्यात डिसइन्फेक्टंट स्प्रे करण्यात येणार आहे.
सिनेमागृहात आता प्रत्येकाला एक सीटचं अंतर ठेऊनच चित्रपट पाहावा लागत आहे.
सिनेमागृहांनीही कोरोनाच्या नियमावलींना फॉलो करण्यासाठी पूर्णपणे कंबर कसली असून त्यात हयगय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
सिनेमा बघताना प्रेक्षक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतील याची खास खबरदारी घेण्यात येत आहे.
सिनेमागृहात फक्त पॅक फूड नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रेक्षकांनाच नाही तर सफाई कर्मचाऱ्यांनासुद्धा विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना पीपीई किट देण्यात आल्या आहेत.
दिल्लीतील सिनेमागृहामध्ये व्हेंटिलेशनसाठी सोय करण्यात आली आहे. एसीचं तापमाण 24 ते 30 डिग्री सेल्सियस एवढंच ठेवण्यात आलं आहे.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला सॅनिटाइझ केलं जात आहे. शरीराचं तापमाण तपासल्या जात असून सर्दी खोकला किंवा कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळल्यास सिनेमागृहांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे.