या टीव्ही कलाकारांनी राजकारणात आजमावलं नशीब, कुणी बनलं मंत्री, पण बाकीच्यांचं काय ?

| Updated on: May 06, 2024 | 3:14 PM

सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वहात आहेत. बॉलीवूड आणि राजकारण यांचे अतिशय जवळचे नाते मानले जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राजकारणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली होती. यापैकी कोणी हरले तर कोणी जिंकले. त्यांच्याप्रमाणेच काही टीव्ही सेलिब्रिटींनी राजकारणात पाऊल टाकलं, त्यांचं पुढे काय झालं ते जाणून घेऊया.

1 / 5
 रुपाली गांगुली ही आज टीव्हीची सर्वात महागडी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनुपमा मालिकेतून लोकप्रियतेचं नवं शिखर गाठणाऱ्या रुपाली गांगुली हिने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

2 / 5
'महाभारत'मध्ये कृष्णाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या नितीश भारद्वाज यांनी 1996 साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांनी जमशेदपूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र, आपल्या अभिनयात पुन्हा बस्तान बसवण्यासाठी त्यांनी राजकारण सोडले. पण नंतर त्याची अभिनय कारकीर्द काही खास चालली नाही.

3 / 5
'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून तूफान लोकप्रियता मिळवलेली तुलसी अर्थात स्मृती इराणी या कॅबिनेट मंत्री आहेत. त्या मानव संसाधन विकास मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि महिला आणि बाल विकास मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत.गेल्या 10 वर्षांपासून त्या केंद्रीय मंत्री आहेत.

4 / 5
रामानंद सागर यांच्या 'रामायण' मुळे लोकप्रिय असलेले अरुण गोविल यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यंदा ते लोकसभा निवडणुकीत मेरठमधून निवडणूक लढवत आहे. 4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. अरुण यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

5 / 5
प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन हा सध्या 'हिरमंडी: द डायमंड बाजार'मुळे चर्चेत आहे. तो एक प्रतिभावान कलाकार आहे. पण त्यांची कारकीर्द फार बहरली नाही.  2009 मध्ये त्यांनी पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.