Marathi News Photo gallery These are five best and popular indian hotels for destination wedding, earlier they were big palace
Destination Wedding Tips : डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध ‘या’ जागा, एकेकाळी होते आलिशान पॅलेस
भारतात सध्या डेस्टिनेशन वेडिंगची खूप क्रेझ आहे. बहुतेक जोडपी हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. सिमला, गोवा किंवा इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळी जाऊन तिथे लग्न करण्याचा प्लान अनेक जण करतात. भारतात अशी अनेक, बरीच मोठी हॉटेल्स आहेत जिथे लग्न करणं हे अनेकांसाठी स्वप्नवत असतं. अशाच काही ठिकाणांबद्दल चला जाणून घेऊया..
1 / 6
उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं लग्न पार पडलं. त्यापूर्वी कतरिना कैफ-विकी कौशल, प्रियांका चोप्रा, यांनीही राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन केले जाते. एकेकाळी राजवाडे असलेल्या या ठिकाणांचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. भारतातील अशाच 5 हॉटेल्सबद्दल जाणून घेऊया, जी डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहेत. (फोटो: Inst/@tajlakepalace)
2 / 6
ताज लेक पॅलेस, उदयपूर : उदयपूरच्या पिचोला तलावावर असलेले ताज लेक पॅलेस हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. तलावाच्या मध्यभागी वसलेल्या या हॉटेलचे सौंदर्य अनेकांना वेड लावते. पूर्वी हा एक अतिशय सुंदर राजवाडा होता आणि नंतर त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले. बरेच लोक सुट्ट्या आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी इथे येतात. (फोटो: Insta/@tajlakepalace)
3 / 6
फलकनुमा पॅलेस, हैदराबाद : आपले सौंदर्य आणि भव्यतेसाठी जगात प्रसिद्ध असलेला फलकनुमा पॅलेस हैदराबादमध्ये आहे. चारमिनारपासून अवघ्या काही अतंरावर तो आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वर्षातील कोणत्याही वेळी येथे येऊ शकता. भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेला हा पॅलेस रॉयल डेस्टिनेशन वेडिंगसाठी देखील चांगला पर्याय आहे. (फोटो: Insta/@tajfalaknuma)
4 / 6
रामबाग पॅलेस, जयपूर : हे हॉटेल एकेकाळी जयपूरच्या महाराजांचे निवासस्थान होते. हा राजेशाही पॅलेस दिसायला खूप सुंदर आहे. या पॅलेसला जयपूरचे भूषण देखील म्हटलं जातं. (फोटो: Insta/@rambaghpalace)
5 / 6
नीमराना फोर्ट, राजस्थान : दिल्लीपासून अवघ्या 122 किलोमीटर अंतरावर असलेला राजस्थानचा नीमराना किल्ला हा देखील एकेकाळी राजवाडा होता. पण आता ते हॉटेल म्हणून वापरलं जातं. डेस्टिनेशन वेडिंग आणि इतर अनेक प्रकारच्या पार्टीसाठी बरेच जण त्याची निवड करतात. (फोटो: Insta/@wahhrajasthan)
6 / 6