Porsche Car : भारतीय बाजारात ही आहेत पोर्शची मॉडल, आलिशान कारचे हे आहे वैशिष्ट्य
Porsche Cars in India : पुण्यातील अपघात प्रकरणात भारतात पोर्श कारची चर्चा आहे. भारतात या आलिशान आणि महागड्या कारचे अनेक मॉडल उपलब्ध आहेत. ही कार अवघ्या काही सेकंदात हवेशी गप्पा करते.
1 / 6
Porsche Taycan एक दमदार इलेक्ट्रिक कार आहे. सिंगल चार्जिंगमध्ये ही कार 678 किलोमीटर धावते. केवळ 4.8 सेकंदात ही कार 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.70 कोटी रुपयांपासून सुरु होते.
2 / 6
Porsche 718 Cayman ही एक आलिशान कार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिन व्हेरिएंट देण्यात आले आहे. या कारच्या इंजिनमधून 220 kW वा 300 hp ची शक्ती मिळते. ही कार 4.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. या कारची एक्स-शोरुम किंमत 1.48 कोटी रुपये आहे.
3 / 6
Porsche 911 Carrera S ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये 331 kW वा 450 PS ची शक्ती निर्मित होते. ही कार 3.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. पोर्शच्या या कारची एक्स-शोरुम किंमत 2.01 कोटी रुपये आहे.
4 / 6
Porsche Panamera Platimun Edition पण भारतीय बाजारात आहे. या कारचा टॉप-स्पीड 270 kmph आहे. ही कार 5.6 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारची एक्स-शोरुम किंमत 1.72 कोटी रुपये आहे.
5 / 6
Porsche Macan S ही एक जोरदार लक्झिरियस कार आहे. ही कार 4.8 सेकंदात 0 ते 100 kmph ची पॉवर जनरेट करते. या कारचा टॉप-स्पीड 259 kmph आहे. Macan S ची एक्स-शोरूम किंमत 1.44 कोटी रुपये आहे.
6 / 6
Porche Macan T ही कार भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये 20-इंचाची Macan S व्हील्स आहेत. या कारची टॉप-स्पीड 232 kmph आहे. सोबतच Porsche Cayenne Coupe ही एक कार आहे. तिची किंमत 1.42 कोटींच्या घरात आहे.