Marathi News Photo gallery These are the amazing forts built by Chatrapati Shivaji Maharaj have a look at it
Photo Gallery : शत्रूच काय? चिटपाखरंही फिरकू शकत नाही… शिवाजी महाराजांचे हे किल्ले माहीत असायलाच हवे
छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील शूर योद्ध्यांपैकी एक होते. अत्यंत सामान्य लोकांना हाताशी धरून त्यांनी आपली फौज निर्माण केली. कमी मनुष्यबळाच्या जोरावर आपल्या बुद्धीचातुर्याने त्यांनी शत्रूला पाणी पाजलं. शिवाजी महाराजच काय पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं नाव ऐकूनही मुघल सल्तनतला कापरं भरायचं. इतका शिवाजी महाराजांचा दरारा होता. त्यांच्या किल्ल्यांच्या तटबंदीत तर शत्रूच काय? चिटपाखरांनाही परवानगी शिवाय येता येत नव्हतं. शिवाजी महाराजांचे हे किल्ले अधिक रहस्यमय होते. अभेद्य होते. आणि वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूनाही होते. या किल्ल्यांची माहिती असायलाच हवी.