रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत : पालकमध्ये 'अ' जीवनसत्व असतं त्यामुळे श्वसनासंबंधिच्या रोगांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. रोज एक कप पालकाचं सेवन केल्यास उपयुक्त ठरू शकतं.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत : पालकमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असतं त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुणांसाठी पालकाचं सेवन करणं महत्वाचं आहे.
कर्क रोगाला थांबवतो : पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात.
हाडांना मजबूत करण्यास मदत : पालकमध्ये 'क' जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.
वजन कमी करण्यास मदत : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पालकाचं सेवन करा. पालकमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.