पिस्ता : हिवाळ्यात मुलांना दररोज पिस्ता खायला द्यावा. पिस्त्यामध्ये ए, सी, ई, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सिन आणि फोलेट यांसारखी आवश्यक जीवनसत्वे असतात. या सर्व पोषक घटकांच्या मदतीने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यांता मानसिक विकासही चांगला होतो.