मारुती कंपनीच्या या पाच गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने फेल ! क्रॅश टेस्टमध्ये असं मिळालं रेटिंग
Maruti Suzuki Car Crash Test : मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या सुरक्षा चाचणीत नापास झाल्याचं समोर आलं आहे. देशात सर्वाधिक विक्री होणारे पाच मॉडेल्सना दोन सुरक्षा स्टारही मिळाले नाही. क्रॅश टेस्टमधील या गाड्या भारतात तयार केल्या आहेत. चला जाणून घेऊयात या गाड्यांबाबत
1 / 5
Maruti Suzuki Alto K10 : देशात सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत अल्टो के 10 ने निराशा केली आहे. ग्लोबल एनसीपीए क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ कॅटेगरीत या कारला फक्त दोन स्टार मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी पूर्णपणे फेल आहे. (Photo: GNCAP)
2 / 5
Maruti Suzuki Wagon R : मारुती वेगनआर गाडीही अपघआत चाचणीत फेल ठरली आहे. प्रौढ कॅटगरीत फक्त एक स्टार मिळाला आहे. तर लहान मुलांसाठी ही गाडी सुरक्षित नसल्याचं समोर आहे. (Photo: GNCAP)
3 / 5
Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्टनं ग्लोबल एसीपीए क्रॅश टेस्टमध्ये निराशा केली आहे. स्विफ्टला प्रौढ आणि मुलांच्या दृष्टीने एक स्टार मिळाला आहे. लहान मुलांना या गाडीतून प्रवास करणं सुरक्षित नाही, असंच म्हणावं लागेल. (Photo: GNCAP)
4 / 5
Maruti Suzuki S-Presso : मारुती सुझुकीची चौथी गाडी या क्रमवारीत आहे. मारुती एस प्रेसोला फक्त एक स्टार मिळाला आहे. प्रौढांसाठी एक स्टार, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी शून्य रेटिंग मिळालं आहे. (Photo: GNCAP)
5 / 5
Maruti Suzuki Ignis : मारुती इग्निसला प्रौढ कॅटेगरीत एक स्टार मिळाला आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी शून्य रेटिंग मिळालं आहे. (Photo: GNCAP)