Electric Scooters : या पाच इलेक्ट्रिक स्कुटरची बातच न्यारी, जबरदस्त रेंज आणि किंमत फक्त…

| Updated on: Apr 04, 2023 | 8:54 PM

इलेक्ट्रिक स्कुटर घेण्यापूर्वी त्या गाडीच्या परफॉर्मन्स कसा याबाबत प्रश्न पडतो. खासकरून गाडीची रेंज किती आहे आणि किंमत खिशाला परवडणारी आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

1 / 5
Simple One: यादीत सर्वात पहिला नंबर सिंपल वन इलेक्ट्रिक स्कुटरचा येतो. या स्कुटरमध्ये जबरदस्त बॅटरी असून फुल चार्जवर 236 किमीची रेंज देते. या गाडीची एक्स शोरूम किंमत 1.10 ते 1.45 लाख रुपये आहे. ही स्कुटरचा टॉप स्पीड 105 किमी प्रतितास आहे. (Photo: Simple Energy)

2 / 5
Prevail Electric Elite: प्रिवेल इलेक्ट्रिक एलिट स्कुटरची रेंजही चांगली आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर फुल चार्ज असेल तर 220 किमीपर्यंत प्रवास करू शकते. विना जीएसटी या स्कुटरची किमत 1,29,999 रुपये आहे. प्रिवेल स्कुटर 80 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.  (Prevail Electric)

3 / 5
Ola S1 Pro: देशात सर्वात मागणी असलेली इलेक्ट्रिक स्कुटर आहे. तुम्ही या कंपनीची ओला एस 1 प्रो स्कुटर 1.5 लाखापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ओला एस 1 प्रो सिंगल चार्जवर 181 किमीपर्यंत धावते. या गाडीची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे. (Photo: Ola Electric)

4 / 5
Ather 450X: एथर कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटरही चांगलं ऑप्शन ठरेल.  एथर 450 एक्स 146 किमी रेंज देते. ही स्कुटर 3.3 सेंकदात 0 ते 40 किमी स्पीड पकडते. सब्सिडीसह या गाडीची किंमत 1.41 लाख रुपये आहे. (Photo: Ather Energy)

5 / 5
Vida V1: हिरो मोटोकॉर्पची इलेक्ट्रिक विडा व्ही 1 ही पहिली इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या स्कुटरची किंमत 1.39 लाख रुपये आहे. या स्कुटरची बॅटरी 65 मिनिटात 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. एकदा फुल चार्ज झाली की 95 किमी रेंज देते. (Photo: Vida)