नितळ व चमकदार त्वचेसाठी अनेक लोक विविध सौंदर्य प्रसाधनांचा, केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करताना दिसतात. मात्र या उत्पादनांच्या वापरामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी हेल्दी त्वचेसाठी तुम्ही आहारात अनेक पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेला सखोल पोषण मिळेल.
पपई - पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुरुमांपासून मुक्त राहते. हे बंद छिद्र उघडण्याचे काम करते. यामुळे आपली त्वचा स्वच्छ राहते.
गाजर - गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे आपल्या त्वचेचे सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचवण्यास मदत करते. त्यामुळे आपली त्वचा तरुण राहण्यास मदत होते. तसचे सुरकुत्यांची समस्या दूर होते. गाजराचा रस तुम्ही नियमित सेवन करू शकता.
बीट - बीट हे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक घटक असतात. आपण बीटाचे सेवन सॅलॅड आणि ज्यूसच्या स्वरूपात करू शकतो.
पालक - पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच पालकात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही असतात. हे त्वचेला खराब होण्यापासून वाचवण्यास मदत करते. तुम्ही पालकाची भाजी, रस किंवा पालकाच्या स्मूदीचे सेवन करू शकता.