Food News : या पदार्थांवर परदेशात आहे बंदी, पण भारतीय आवडीने करतात फस्त; तुम्हीही खाता का हे पदार्थ ?
काही खाद्यपदार्थ असे आहेत जे भारतीय लोक फार विचार न करता बेधडक खाऊन टाकतात, पण जगात अनेक ठिकाणी त्यावर बंदी लावण्यात आलेली आहे. जाणून घ्या या गोष्टींबद्दल..
1 / 5
भारतात असे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत ज्यांचे लोक चाहते आहेत आणि ते खाण्याची आवडही आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगभरातील अनेक देशांमध्ये या गोष्टी खाण्यास मनाई अथवा बंदी आहे. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
2 / 5
डिस्प्रिनवर बॅन : डोकं दुखत असेल तर भारतातील लोक डिस्प्रिन टॅब्लेट घेतात. काही क्षणातच आराम देणाऱ्या या औषधावर अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. भारतातील मेडिकल स्टोअर्समध्ये हे औषध सहज उपलब्ध असले तरी अमेरिकेत त्याची विक्री करणे कायदेशीर गुन्हा मानला जातो.
3 / 5
केचअपच्या फॅन्सनी व्हा सावध : लहान मुलं आणि मोठी माणसं देखील नूडल्स, सँडविच, फ्रेंच फ्राईज आणि इतर पदार्थांसोबत केचप खातात. भारतात पिझ्झा आणि पास्ताची चव केचपशिवाय अपूर्ण मानली जाते. पण लहान मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन फ्रान्समध्ये केचपवर बंदी घालण्यात आली आहे.
4 / 5
च्यवनप्राश : भारतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाल्ले जाते. औषधी गुणधर्मामुळे भारतातील नागरिक दीर्घकाळापासून च्यवनप्राश खाल्ले जाते. पण रिपोर्ट्सनुसार, कॅनडामध्ये यावर बंदी आहे.
5 / 5
या देशात समोशावर आहे बंदी : भारतातील प्रत्येक रस्त्यावर किंवा कोपऱ्या-कोपऱ्यावर आपल्याला समोसा विकताना दिसतात. भारतातील बहुतांश नागरिक समोसाप्रेमी आहेत आणि चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून समोशांचा आनंद लुटतात. पण रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकन देश सोमालियामध्ये समोसे खाण्यावर बंदी आहे. येथे त्याच्या आकाराबद्दल विवाद आहे.